पोस्ट्स

आपला मुलगा प्रेमात पडला....

इमेज
  आपला मुलगा प्रेमात पडला.... मैत्रिणीचा फोन आला, बोलली मुलगा प्रेमात पडलाय काय करू? अरे हा काय प्रश्न आहे का? मुलगा प्रेमात पडला तर तू आनंदी हो की. त्याच्या मनात त्या सुंदर भावना तयार झाल्या. एकतर त्या फुलव नाहीतर गपचुप बैस, उगा पुरातन काळातले सल्ले देऊ नकोस त्याला आणि उगाच त्याचे प्रेम कोमेजून टाकू नकोस. होऊ दे मोकळ त्याला. जगू दे त्याला त्याचे विश्व. साधा सरळ सोपा पर्याय प्रथम दर्शनी एक हेल्दी मनाच्या व्यक्तीने तरी हाच विचार केला पाहिजे. परंतु वाटावा तितका सोपा प्रश्न असता तर मैत्रिणींनी सल्लाच मागितला नसता. प्रॉब्लेम खूप वेगळे होते तिचे वरून दिसणारे प्रॉब्लेम जात,राहणीमान ,परिस्थिती,आणि शिक्षण हे सगळे प्रश्न आ वासून समोर उभे होते. मैत्रिणीला सांगितले तुला ती मुलगी आवडली का? आवडली तर आवडल्याचे दहा कारण सांग आणि नाही आवडली तर न आवडल्याचे दहा कारण सांग. आवडल्याचे फक्त दोन कारण तिने सांगितले. ते म्हणजे ती दिसायला छान आहे आणि ती नीटनेटक्या कपड्यात वावरते. ह्या दोन्ही गोष्टींना काहीही अर्थ नाही. कारण त्या काळ आणि परिस्थिती नुसार बदलणार. त्या शाश्वत गोष्टी नाही. शाश्वत गोष्टीत काही सा

फिरुनी नवी जन्मेन मी

इमेज
  दिवस सुरू झाला की मी गाणे लावते. पहिलं गाणं असत माणसाने माणसाशी माणसासम वागणे. एकीकडे काम चालू असते. खूपदा मनात हेच येत की मी सगळ्यांशी चांगल वागते. मला खूप लोक चांगले भेटले जे सतत मला मदत करायला तयार असतात. ज्यांना माझी खूप प्रगती झालेली पहायची आहे. आणि ते हर एक प्रकारे माझी मदत करत असतात. पण एक टक्का खराब, स्वार्थी, भामटे,लालची माणसे भेटतात. चांगल्या लोकांविषयी विचार केला तर मन आपोआप उत्साही होते. चेहऱ्यावर एक आनंद, मनाचे समाधान आणि त्या लोकांसाठी खूपसाऱ्या दुवा माझे मन मागतेच. त्रासदायक व्यक्ती विषयी मनात एकच विचार येतो. की ही व्यक्ती आपल्या आयुष्यात फक्त त्रास द्यायला आली नाही तर आपल्याला खूप काही शिकवून गेली. पुढचा बराच वेळ कदाचित ऑफिसला जाईपर्यंत डोक्यात हेच विचार घोळत असतात. ऑफिसला आले की एकीकडे लॅपटॉप चालू करायचा आणि गुलजारच्या गझल लावायच्या. पहिलं गाणं तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू का नाराज नसावं मी जिंदगी वर? का हैराण होऊन तटस्थपणे बघत राहू. भरल्या डोळ्यांनी काम करत राहावं. केबिनच्या डोअरला नॉक झाले की आधी डोळ्याच्या कडा हलकेच भिरकवायच्या आणि हसतच स्मोरच्याशी बोलायचे.

जगजितसिंग माझे मन गाण्यातून गाऊन दाखवतोय.

  निर्विकार बनून मी जगजितसिंग ला कधीच ऐकू शकत नाही. अस वाटतं जगजितसिंग फक्त माझे मन गाण्यातून गाऊन दाखवतोय. सदमा तो है मुझे भी की तुझसे जुदा हु मै... बिखरा पड़ा है तेरे ही घर में तेरा वजूद बेकार महफ़िलों में तुझे ढूँडता हूँ मैं हे खरंच अस का होत.. जीव लावलेली व्यक्ती आपल्या जवळ नसणे किती खोलवर जखम करणारे दु:ख आहे हे.आणि सर्वात मोठं म्हणजे वाट बघणे. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले........ ....बहुत बे-आबरू होकर तेरे कोचे से हम निकले. कुणी असही कोणाच्या दारा समोरून बेअब्रू होऊन निघत असेल का? मग एव्हढ बेअब्रू होई पर्यंत ही व्यक्ती प्रेम करत बसलीच कशी? समोरच्याला आपल प्रेम उघड करू शकली नाही की ते प्रेम समोरच्याला समजले नाही? मिर्झा गालिब ला खूप काही सांगायचे होते यातून. खूप गुपिते उघड करायचे होते.हे मात्र नक्की. प्रेमात जगण्यात आणि मरण्यात काही फरकच नाहीये. प्रेम जगत असताना ती व्यक्ती किती मरण मरत असते तिचे तिलाच माहिती आहे. हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते वक़्त की शाख़ से लम्हें नहीं तोड़ा करते......... तूने आवाज़ नहीं दी कभी मुड़कर वरना हम कई सदियाँ तुझे घूम के दे

गॅदरींग

  शाळा कॉलेजमध्ये असताना गॅदरींगचे फार अप्रूप होते.आता वर्गातल्या सर्व मुलांना गॅदरींग मध्ये भाग घेता येतो तस पूर्वी आमच्या वेळेस नव्हते. बाईंच्या फेवरेट विद्यार्थिनींना हा चान्स मिळत. सुदैवाने मी बाईंची आवडती विद्यार्थिनी असल्यामुळे अनेक वर्षे शाळेच्या गॅदरींगमध्ये भाग घेता येत होता. बऱ्याचदा मेनरोल करायला मिळाला . गोल चेहरा असल्यामुळे आणि गोसावी बाईंची खूप आवडती असल्यामुळे त्यांनी मला नववीला असतांना गांधीजी ही मुख्य भूमिका साकारायला लावली. वयात आलेली मी गांधीजींची भूमिका करणे म्हणजे तो पोशाख करणे मला खूप लाजिरवाणे झाले होते. पण बाईंना नाही कस म्हणायचं आणि शिवाय मुख्य भूमिका... झालं तर मग , गांधीजी मी होणार होती. घरात सांगितलं मला नाटकात घेतलं गांधीजी होणार. बस लगेचच ताईने चिडवायला सुरवात केली आणि मी खूप ओशाळली. रोजच चिडवन मला काही केल्या सहन होईना. मग मी नाटकात भाग घ्यायचा नाही असं ठरवलं पण बाईंना नकार कळवन नाही जमलं मला.मग रोजरोजच्या चिडवण्यावर मी उपाय शोधला मी घरात खोटंच सांगितलं आमचं नाटक रद्द झालं. बघू पुढे काय करायचं असा विचार करत मी वेळ मारून नेली. आता शाळेत बाईंनी अजून एक बॉ

तो होताच वेगळा, अगदी जगा वेगळा भाग -3

आमचा बघण्याचा कार्यक्रम सुध्दा टिपिकल झाला नाही. मी नेहेमी प्रमाणे सकाळी माझ्या वेळेत कॉलेजला चालत चालत जात होती. घरापासून कॉलेज जे अंतर चालव लागायचं तिथे वाटेत ते ब्राम्हण समाज मंगल कार्यालय होत. जातांना मला त्या मंगल कार्यालयाच्या गर्दी समोरून चालत जावं लागलं. मंगल कार्यालया वर बोर्ड वाचला आहिरे बोरसे आपले स्वागत करत आहे. बोर्ड वाचला तत्क्षणी इग्नोर सुध्दा केला. पुढचे वळण वळत नाही तोच मागून गाडीचा ओळखीचा हॉर्न. चालत राहिली छे आत्ता ह्या वेळेस हा कसा काय येईल. पुन्हा हॉर्न वाढला. माझ्या अगदी शेजारीच गाडी उभी करत तो बोलला, चल तुला कॉलेजला सोडतो. अरे तू आत्ता इथे? घरी काय सांगून आला? अग ताईच्या दिराच लग्न आहे आज फॅमिली बरोबर आलोय. अच्छा म्हणजे त्या कार्यालया समोरून मी आले तर तू पाहिलं वाटतं मला. आणि ह्या कपड्यात लग्नाला जाणार? हो पूर्ण आवरूनच आलोय. सकाळी नानांच्या शिव्या सुध्दा खाल्या चांगले कपडे घातले नाही म्हणून. हो चांगले नाहीये तुझे हे कपडे. जाऊ दे कुणी आपल्याला बघायच्या आत चल मी सोडतो तुला कॉलेजला. मला काय तेच हवं होत. मी लगेच त्याच्या गाडीवर दोन्ही बाजूला पाय टाकून, दोन्ह

तो होताच वेगळा, अगदी जगा वेगळा भाग 2

त्या दिवसाच्या अपघातानंतर माझे आयुष्य पूर्ण बदलले होते. हुरहुर लागली होती. काही जवळ आहे की खूप काही हरवलं अशी अवस्था होती. माझे मन त्या अनोळखी माणसासाठी सैरभैर धावत होते. काहीतरी शोधत होते. मनाच्या यातना इतक्या होत्या की शरीराच्या होणाऱ्या यातनांकडे लक्ष जात नव्हते. मनापासून माझे हृदय त्या अनोळखी व्यक्तीस हाक घालत होते. प्रेमात पडल्याचे हे भले मोठे लक्षण होते. पण मी काहीही करू शकत नव्हते.खूप गोष्टी शक्य असूनही मला त्या बोलावयास जमल्या नव्हत्या. अनेक गोष्टी हातात येता येता सुटून गेल्या होत्या. परत मिळतील की नाही काही कल्पना नव्हत्या. हताश मनाने माझे रोजचे काम सुरू झाले होते. घर कॉलेज आणि कॉलेज घर . बस हेच काय ते जगणे होते का? किती निरस आणि लांबलचक आयुष्य झाले होते. अचानक तो पुन्हा एकदा समोर आला. मन आनंदाने भरून गेले. मनाशी पूर्ण ठरवले ज्या चुका केल्या त्या नाही करायच्या. आता तो समोर आला तर त्याचे नाव पत्ता फोननंबर सर्व सर्व विचारायचे. ह्या आठ दिवस माझ्या मनानी भोगलेल्या यातना परत भोगायाच्या नाही. आता याला सोडायचं नाही. शेक हॅण्ड साठी त्याने पुढे केलेला हात मी किती आघाश्या सारखा धर

तो होताच खूप वेगळा,अगदी जगा वेगळा. भाग -1

  त्याच्या माझ्या पहिल्या भेटीपासून मला जाणवलं होत हा काही वेगळाच आहे. त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर मी घाई घाईत चालत घराच्या दिशेने येत होती. कॉलेज ते घर 3 किलोमिटरचे अंतर, यायला जायला काही साधन नाही. म्हणून रोजचा प्रवास चालतच. अशीच मी घाईत घरी यायला निघाली आणि अचानक माझ्या मागून येणाऱ्या गाडीवाल्याचा गाडी वरचा कंट्रोल गेला आणि त्याने मागूनच मला जोरदार धक्का दिला. मी थोडी लांब जाऊन पडली. हातातली पुस्तकं रस्त्यावर अस्थाव्यस्थ पडली. खूप लागलं, खूप खरचडल. स्वतःला सावरत मी उठायचा प्रयत्न केला. त्याने गाडी बाजूला लावली आणि मला सावरायला तो जवळ आला. डोळ्यातल्या अश्रूनेच मी त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला. खूप सॉरी म्हणत तो समोर आला माझे पुस्तकं उचलून दिली. आणि मला हात देत तो बोलला," मी तुम्हाला घरी सोडून देतो." "तुझ्याबरोबर मी येईल असं वाटलं का तुला?" "प्लिज माफ करा, चुकून झालं, गाडी कंट्रोल बाहेर गेली होती" "हो ना, तू गाडी वाला चालणाऱ्या लोकांची काही किंमतच नाही ना तुझ्या दृष्टीने" "हो मान्य आहे मला, पण हट्ट नका करू आपण आधी दवाखान्यात जाऊ. खूप खर